छाननीमध्ये सदस्य पदासाठीची चार नामनिर्देशन पत्रे अवैध

खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आज झालेल्या नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये सदस्य पदासाठीची चार नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. यामध्ये खरसुंडीमधील दोन, दिघंची व लिंगीवरेतील प्रत्येकी एक अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे.
गावनिहाय सरपंच + सदस्य पदांसाठी वैध नामनिर्देशनपत्र संख्या पुढीलप्रमाणे :
आवळाई ७+४०,
गोमेवाडी ७+३६,
कुरुंदवाडी १+१०,
माळेवाडी ८+३१,
पारेकरवाडी ५+१६,
तडवळे ७+४२,
उंबरगाव ४+३२,
यपावाडी ६+४४,
खरसुंडी १४+७०,
पुजारवाडी (दि) ८+४५,
गळवेवाडी ६+४४,
पिंपरी बु.४+२२,
बाळेवाडी ५+२८,
जांभुळणी ६+२५,
कौठुळी ५+३७,
पडळकरवाडी ५+११,
घाणंद ३+२४,
हिवतड ६+२५,
कामथ ४+१७,
पळसखेल ४+२८,
दिघंची ८+१०६,
लिंगीवरे ७+२७,
राजेवाडी ७+३०,
वलवण ४+२८,
झरे ४+२८
अशी सरपंच व सदस्य पदासाठी वैध नामनिर्देशन पत्र आहेत.