प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी

घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण ज्ञानू कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे १ वर्ष उपसरपंच धनाजी जूगदर हे होते. त्यांनी १ वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यांनतर प्रविण कदम यांचा अर्ज दाखल केला होता. इतर कोणाचाही अर्ज न आल्याने ते बिनविरोध निवडून आले. सरपंच सौ.कविता किसन कटरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, डी. एन.कदम,किसन कटरे, मा चेअरमन विष्णू आबा जूगदर, माजी सरपंच नारायण ढगे, माजी सरपंच सोना कदम तानाजीराव रामुगडे, दत्ता झंजे, कटरे गुरुजी, रामचंद्र वाघमोडे,तुकाराम वाघमारे, लव्हाजी होनमाने , भरत माने व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन
भाजपच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी जयवंतराव सरगर यांची निवड