
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
अर्थक्रांती जीवन गौरव ज्येष्ट नागरीक संघटनेच्या वतीने, येत्या १ ऑक्टोबरला, आमदारांच्या दारात पिठलं – भाकरी ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
सर्वश्री सादिक खाटीक, व्ही . एन . देशमुख, नंदकुमार राक्षे, दत्तात्रय मोकाशी, पोपटराव उर्फ विठ्ठलराव देशमुख, अरविंद चांडवले, दिलीपराव सपाटे, अनिलराजे देशमुख,
हणमंतराव राक्षे,
अशोकराव उकीरडे, रामचंद्र भिसे, मोहनराव मोकाशी
राबियाँबसरी खाटीक यांनी आज आटपाडी तालुक्यातील प्रिंट मिडीया आणि सोशल मिडीयाशी संवाद साधताना ही माहिती दिली .
राज्याच्या विधीमंडळात ज्येष्ठांच्या प्रश्नावर आमदारांनी जोरदार आवाज उठवावा. ज्येष्ठांच्या न्याय मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी आमदारांच्या दारात स्वतःची पिठलं – भाकरी खात येत्या १ ऑक्टोबरला केल्या जाणाऱ्या ठिय्या आंदोलनात आटपाडी – खानापुर तालुक्यातील तसेच विसापूर सर्कल मधील असंख्य ज्येष्ट नागरीक सहभागी होत असल्याची माहिती या मान्यवरांनी दिली .
असंख्य ज्येष्ट नागरीक विटा येथे आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या दारात हे ठिय्या आंदोलन करणार आहेत .
महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्रातून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा रु. ७,०००/- सन्मानधन देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात येते. मात्र, आजपर्यंत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने राज्यातील ज्येष्ट नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे. शासनाने निर्णय घेतला, मग अंमलबजावणीला विलंब का ? ज्येष्ठ नागरिकांच्या संयमाची परीक्षा आणखी किती दिवस घेतली जाणार आहे .
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या न्याय्य मागणीसाठी पंढरपूर येथे नामदेव पायरी ज्येष्ठ नागरिक सन्मानवारी आणि कोल्हापूर येथे महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक सन्मानवारी काढून हजारो अर्ज संकलित केले होते . हे अर्ज देवाच्या चरणी ठेवून मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविण्यात आले. तरीही सन्मान धनाच्या अंमलबजावणी बाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आता लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष न करता आगामी हिवाळी अधिवेशनात दरमहा रु. ७,०००/- सन्मान धनाचा विषय ठामपणे मांडून आवश्यक मंजुरी व आर्थिक तरतूद करून घ्यावी.
यासाठी १ ऑक्टोबर २०२६ ला ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही लढा देण्यासाठी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्यातील अनेक तालुक्यातील आमदारांच्या निवासस्थानी “ पिठले – भाकरी ठिय्या आंदोलन ” करण्यात येत आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती विरोधात नसून, शासनाच्या प्रलंबित निर्णयाच्या अंमलबजावणी साठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक जगण्याच्या हक्कासाठी असेल.
शासनाने दरमहा रु. ७,०००/- सन्मान धनाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. आगामी हिवाळी अधिवेशनात आवश्यक मंजुरी व आर्थिक तरतूद करून घ्यावी . सन्मानधन वितरणाची स्पष्ट काल मर्यादा जाहीर करावी. ज्येष्ट नागरिकांच्या सन्मान, स्वाभिमान आणि आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित ही मागणी असल्यामुळे खानापूर विधानसभा व अन्य सर्व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांनी लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने आणि शांतता संयमाने सहभागी व्हावे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या संयमाचा अंत होण्यापूर्वी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही आवाहन या मान्यवरांनी केले आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
तिसरं महायुद्ध ;जगाला युद्ध नको बुद्ध हवा