


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ८८ व सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. आजअखेर सरपंच पदासाठी एकूण १४५ व सदस्य पदासाठी ८५१ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
पहिल्या दिवशी दि.२८ रोजी सरपंच पदासाठी तीन व सदस्य पदासाठी एक, दुसऱ्या दिवशी दि.२९ रोजी सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी १५,बुधवारी तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८, गुरुवारी सरपंच पदासाठी २९ व सदस्य पदासाठी १७९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती.तर आज शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ८८ व सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पदे पत्रे प्राप्त झाली आहेत. तालुक्यात २५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी एकूण १४५ व सदस्य पदासाठी ८५१ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
आजअखेर गावनिहाय सरपंच + सदस्य नामनिर्देशनपत्र दाखल संख्या पुढीलप्रमाणे :
आवळाई ७+४०,
गोमेवाडी ७+३६,
कुरुंदवाडी १+१०,
माळेवाडी ८+३१,
पारेकरवाडी ५+१६,
तडवळे ७+४२,
उंबरगाव ४+३२,
यपावाडी ६+४४,
खरसुंडी १४+७२,
पुजारवाडी (दि) ८+४४,
गळवेवाडी ६+४४,
पिंपरी बु.४+२२,
बाळेवाडी ५+३१,
जांभुळणी ६+२५,
कौठुळी ५+३७,
पडळकरवाडी ५+११,
घाणंद ३+२४,
हिवतड ६+२४,
कामथ ४+१७,
पळसखेल ४+२८,
दिघंची ८+१०७,
लिंगीवरे ७+२८,
राजेवाडी ७+३०,
वलवण ४+२८,
झरे ४+२८
अशी सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.प्राप्त आकडेवारीनुसार कुरुंदवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन