
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आज आटपाडी येथे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय नोकरीपासून वंचित ठेवून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व उबाठा गट या तिन्ही पक्षाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी कंत्राट भरतीचे खापर युती सरकारवर फोडत केल्या जाणाऱ्या घाणेरड्या राजकारणाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने कंत्राटी निर्णय रद्द करून महाराष्ट्रातील तमाम तरुण-तरुणी, युवकांना दिलासा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
युवानायक अनिलशेठ पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
भाजपच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी जयवंतराव सरगर यांची निवड