


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चोथ्या दिवशी सरपंच पदासाठी २९ व सदस्य पदासाठी १७९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. आजअखेर चार दिवसात सरपंच पदासाठी ५७ व सदस्य पदासाठी २५३ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.
पहिल्या दिवशी दि.२८ रोजी सरपंच पदासाठी तीन व सदस्य पदासाठी एक, दुसऱ्या दिवशी दि.२९ रोजी सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी १५,बुधवारी तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८,आज गुरुवारी सरपंच पदासाठी २९ व सदस्य पदासाठी १७९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
आज गावनिहाय सरपंच + सदस्य नामनिर्देशनपत्र दाखल संख्या पुढीलप्रमाणे : आवळाई१+९, गोमेवाडी २+१, कुरुंदवाडी ०+२, माळेवाडी २+११, तडवळे ०+२, उंबरगाव ०+१५, यपावाडी ३+१५, खरसुंडी ०+१३, पुजारवाडी (दि) २+१, गळवेवाडी १+१५, बाळेवाडी १+१५, जांभुळणी २+४, कौठुळी ४+२२, हिवतड २+१२, कामथ २+१२, पळसखेल ३+१०, दिघंची २+११, लिंगीवरे १+४, राजेवाडी २+१२, वलवण १+४ अशी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन