


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज पारंपारिक पद्धतीने स्वीकारणार असल्याची माहिती तहसीलदार बी.एस.माने यांनी दिली.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे तसे आदेश तहसील कार्यालयात उपलब्ध झाले आहेत. या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार कोणीही अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तसेच वेळही ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे
ऑनलाइन अर्ज भरत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने अनेक वेळा सर्वर डाऊन होत आहे. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तरी याची नोंद सर्व कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी घ्यावी व आपले अर्ज वेळेत भरावेत. तसेच अर्ज भरण्याची वेळ वाढवली आहे. 02/ 12 /2022 पर्यंत 5.30 पर्यंत ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन