आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ७४ अर्ज दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. आजअखेर तीन दिवसात सरपंच पदासाठी २८ व सदस्य पदासाठी ७४ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.
पहिल्या दिवशी दि.२८ रोजी सरपंच पदासाठी तीन व सदस्य पदासाठी एक, कालच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ रोजी सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी १५ तर आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
आज गावनिहाय सरपंच + सदस्य नामनिर्देशनपत्र दाखल संख्या पुढीलप्रमाणे : आवळाई१+७, गोमेवाडी १+१२, माळेवाडी २+३, उंबरगाव २+३, खरसुंडी ३+४, पुजारवाडी (दि) ०+५, गळवेवाडी ०+३, बाळेवाडी १+१, कौठुळी ०+६,हिवतड ०+४, कामथ ३+७, दिघंची ०+३ लिंगीवरे १+०, राजेवाडी २+० अशी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.