महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने तात्काळ पदमुक्त करावे- परेशकुमार व्होरा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आमचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.केंद्राने राज्यपाल कोशारी यांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष परेशकुमार व्होरा यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भूजबळ यांचेकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल व अर्ध्या हळकुडांने पिवळे असलेले भाजपचे काही नेते वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत जाणून बुजून अपस्मानास्पद उद्गार काढतात व त्याचे महाराष्ट्रातील भाजप नेते समर्थन करतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व इतर सर्व सेल यांच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करतो.व केंद्रशासनाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना तात्काळ पद मुक्त करावे अशा आशयाचे निवेदन आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भूजबळ यांचेकडे देण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विलासराव माने ,तेजसिंह राजेमाने,शांताराम रामचंद्र माने, चंद्रकांत केवटे ,संजय (डावरे) विरकर,विलास रूपनवर ,सचिन लोंबड़े,अंकुश विरकर, आकाश सरतापे,किरण मदने आकाश माने, सुमित बोडरे,करण जाधव, सनी जाधव उपस्थित होते.