माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे :
आमदार रोहित दादा पवार विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या प्रदेश सचिवपदी गोरडवाडी येथील युवा नेते मच्छिंद्र गोरड यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र रोहित पवार विचार मंचाचे अध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी दिले .
निवडीचे पत्र आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते देण्यात आले. रोहितदादा पवार विचार मंचाचे संस्थापक सदस्य मंडळ उपस्थित होते.
रोहितदादा पवार विचार मंच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवणारी व राज्यात नेतृत्व करणारे कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या विचाराने राज्यभर सामाजिक कार्य व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि राज्यातील तळागाळातील सर्वसामान्यांचे हात बळकट करणे,सामाजिक व राजकीय विधायक कार्य उत्तम प्रकारे व नियोजन बद्द साकार करण्याकरता रोहितदादा पवार विचार मंचाची स्थापना केलेली आहे.
येणाऱ्या काळामध्ये विचार मंच प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोचवण्याचे काम करणार व शेतकऱ्यानचे प्रश्न, तळागाळातीत मजुराच्या हाताला काम विध्यार्थींचे प्रश्न , तसेच नविन कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्रात संधी देण्याचे काम करणार सामाजीक हिताचे प्रश्न सोडण्याचे काम करणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये रोहित दादा पवार विचार मंचाचे जाळे विणण्याचे काम सुरू करणार असल्याचे मच्छिंद्र गोरड यांनी सांगितले.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन