
लक्ष्मणराव खटके /(मुख्य प्रतिनिधी ):
महाराष्ट्राचे नेते ना. जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्यात विकास कामाच्या माध्यमातून युवक आणि ज्येष्टांची राष्ट्रवादी मजबूत करणार , असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी करगणी येथे बोलताना वक्त केले .
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करगणी जि.प .गटातील नूतन पदाधिकाऱ्यांना नवनियुक्तीचे पत्रे प्रदान करताना ते बोलत होते . आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांची मोठी शक्ती युवकांना नेहमीच मिळत आली आहे . त्यांच्या माध्यमातून आपण अनेक उद्योग व्यवसाय योजना आणण्याच्या प्रयत्नात आहोत असेही रावसाहेबकाका पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले .
खोटी आश्वासने, भुलथापा देत, जाती धर्मात तेढ निर्माण करीत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला राज्यातून पायउतार, हद्दपार करण्याचे मोठे काम ८० वर्षाच्या तरुण शरद पवार साहेबांनी लाखो तरुणाईच्या साथीने केले . तरुण शक्तीला नेहमीच साथ, समर्थन आणि पाठींबा देण्याची आमची भूमिका असेल असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी यावेळी बोलतना स्पष्ट केले .
कोणतेही काम ,व्यवसाय, उद्योग प्रथमतः करून तरुणांनी स्वतःला प्रापंचीकदृष्ट्या स्थिर करीत सामाजीक , राजकीय क्षेत्रात कार्यरत व्हावे म्हणजे कोणापुढे लाचार न होता ताठ मानेने ,स्वाभीमानाने समाज सेवा करता येईल . अठरापगड जाती, जमाती ,अल्पसंख्य आणि बहुजनांचाच पक्ष असलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदांचा दुरुपयोग होवू न देता ताठ मानेने समाज कार्य करा ,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना केले .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातून मोठे काम उभे करण्याचा आपला मानस असून राष्ट्रवादीच्या आटपाडी तालुका युवक आघाडीचे संघटन जिल्हयात अग्रेसर ठरण्यासाठी ज्येष्टांच्या मदतीने मी यशस्वी होईन असा आशावाद तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील यांनी व्यक्त केला .
प्रारंभी स्वागत प्रास्तावीक रमेश पवार यांनी केले. यावेळी किशोर गायकवाड़ ,किरण कांबळे समाधान पाटील यानी आपले मनोगत व्यक्त केले .नूतन पदाधिकारी झालेल्या.राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष पदी समाधान संजय पाटील यांची , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्षपदी किरण कांबळे , शहर उपाध्यक्षपदी रोहन सवने, तालूका सरचिटणीसपदी हिवतड गावचे सचिन कदम यांना मान्यवरांचे हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली .
राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस समाधान भोसले , युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड , सचिन सावंत आण्णासाहेब कांबळे, नितिन डांगे अमित पाटील अजमुदीन इनामदार राहुल रेड्डी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अप्रतिम सुत्रसंचालन परशुराम पवार यांनी केले तर आभार शरद पवार यांनी मानले .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती