भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची आप्पासाहेब देशमुख यांच्या कार्यालयाला भेट
संजय हुलगे/माळशिरस प्रतिनिधी :
भाजपचे नूतन जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यात बऱ्याच भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.त्यामुळे भाजप तालुकाध्यक्ष नक्की कोण होणार? कोणाच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडणार ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. दौऱ्यामध्ये श्रीकांत देशमुख यांनी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या कार्यालयाला व भाजप नेते बाळासाहेब सरगर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आप्पासाहेब देशमुख, भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, बाळासाहेब वावरे ,बाळासाहेब सरगर , नवनाथ पवार,आदि उपस्थित होते. यावेळी श्रीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या भेटीने भाजपच्या गोटामध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
जिल्हाध्यक्षाचा माळशिरस दौरा जुन्या भाजपला झुकतं माप देतो की नव्याने भारतीय जनता पार्टीत आलेले मोहिते-पाटील यांना? या स्वरूपाच्या चर्चा तालुक्यात रंगू लागल्या आहे. तर मूळत: भाजपमध्ये असलेले परंतु मोहिते-पाटलांशी वाढती निकट असणारा व्यक्ती भाजपचा तालुका अध्यक्ष होईल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तालुकाध्यक्ष निवडीबाबत विचारले असता जिल्हाध्यक्षांनी लवकरच त्यांची निवड केली जाईल असे उत्तर दिले.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन