आटपाडीच्या डायनामिक इंग्लिश मेडियम स्कूलचे १००% यश

सौ.कविता घाडगे,आटपाडी/प्रतिनिधी:
आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या डायनामिक इंग्लिश मेडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वत्र प्रशालेचे अभिनंदन होत आहे .
प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी चमकदार यश संपादन केले. प्रथम क्रमांक कु. साक्षी नानासाहेब पाटील (91.80%) ,दुसरा क्रमांक कु. राधिका राजेंद्र सरगर (91.60%) ,तिसरा क्रमांक कु. तेजस्विनी उत्कर्ष कवडे (91.40%) या प्रज्ञावंत विद्यार्थीनींचा समावेश आहे.

आटपाडीसारख्या ग्रामीण भागातील डायनामिक इंग्लिश मीडियमची शिक्षण पद्धती अत्यंत उत्कृष्ट असून या इंग्लिश मेडीयमची मुले 97% पर्यंत गुण मिळवितात.याचे सर्व श्रेय हे ग्रामीण भागातील मुलांना इंग्लिश मिडीयममधील उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांना जाते. शिवाय संस्थेचे सर्व पदाधिकारी सुद्धा वारंवार मार्गदर्शन करतात. तसेच भेट देऊन शाळेच्या गुणवत्तेची तपासणी करतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या सौ.एल.डी .जाधव ,सुनीता देवकर,कदम सर ,देशमुख सर तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.