
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
पेठ येथे झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आटपाडी येथील गुरूकुल विद्यालयाने माध्यमिक गटात तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान पटकावला आहे. पेठ येथील नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत सहभागी झालेल्या सांगली जिल्ह्यातील अनेक नामवंत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित व खासगी शाळांची तालुका स्तरावर निवड करून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरल्या होत्या.
अंतिम फेरीत आटपाडी तालुक्यातील गुरूकुल विद्यालय , आटपाडी ने ‘स्मार्ट स्पीड ब्रेकर ’ या सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पास माध्यमिक गटात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. तसेच, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सांगली विभागातून निवड करण्यात आली आहे.
प्रदर्शनात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सोहम सागर आणि ऋग्वेद शिंदे या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिल्हा शिक्षण उपसंचालक श्री.महेश चोथे, शिक्षणाधिकारी श्री.लोंढे, शिक्षणाधिकारी श्री.मोहन गायकवाड नानासाहेब महाडिक शिक्षण संकुलाचे राहूल महाडिक, सम्राट महाडिक अन्य मान्यवरांच्या हस्ते चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री .आनंदा पांढरे, श्री.मकरंद जावीर ,सौ.सविता साळुंखे, श्री.विद्याधर वलेकर, मुख्याध्यापक श्री.पोपट साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतराव सांगोलकर, सचिव श्री. नितीन काळे , प्रवर्तक श्री.महादेव (बापू) बाड व सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश
इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न