

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/लिंगीवरे
लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाने आटपाडी तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश मिळवले. बक्षीसपात्र शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक व विद्यार्थ्यांना सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत माध्यमिक गटामधून संतराम जगन्नाथ मदने यांनी अपकेंद्री पद्धतीवरील बनवलेल्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर निर्मित वैज्ञानिक साहित्य निर्मिती स्पर्धेत हणमंत तुकाराम खटके द्वितीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थिंनी प्रज्वली ब्रह्मदेव खटके (इ.८ वी),अंजनी उत्तम महाडिक (इ.९ वी) व अनुष्का बाळू खटके (इ.१० वी) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.एल.जी.खटके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचे अभिनंदन केले.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न