भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे
कविता सवाखंडे

भारती विद्यापीठाचे लोहगाव पुणे येथील इंग्लिश मीडियम स्कूलने , सीबीएसइ चे सीओइ हे दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 रोजी दोन दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणामध्ये क्षमता निर्माण कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक मूल्यांकन आणि मूल्यमापन क्षमता विकसित करणे या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉक्टर यास्मिन कौर, मुख्याध्यापक आर्मी पब्लिक स्कूल खडकवासला आणि श्री. जितेंद्र खैरनार, मुख्याध्यापक ग्लोबल टॅलेंट स्कूल पुणे यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले
कारेक्रमाचे व्यवस्थापन व आयोजन प्रिंसिपल जॉर्ज पी.
एस.सरांनी केले तर कार्यक्रमाचे स्वागत मा. मिनाज पिरजादे आणि मा. अमनदीप कौर यांनी केले.

सदर प्रशिक्षणाकरिता पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहेगाव, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल धनकवडी, एलप्रो इंटरनॅशनल स्कूल, ब्लूमिंग हाऊस ऑफ नॉलेज उंड्री, श्री पार्श्व प्रज्ञालय तळेगाव, संस्कृती स्कूल वाघोली या शाळेतील शिक्षक सहभागी झाले होते.तर कारेक्रमाचे आभार नीलिमा ढमढेरे मॅडम यांनी केले.