माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे :
येथील गोपाळराव देव प्रशाला माळशिरस या प्रशालेतील विद्यार्थिनीं पोर्णिमा तानाजी मगर ह्या विद्यार्थिनींचे गारवाड गाव हे माळशिरस पासुन १७ कि मी अंतरावर आहे. घरची परिस्थिती बेताची होती . तिला अभ्यासाची आवड होती,त्यामुळे पहाटे उठुन वाचन करायची आणि सर्व आटपून शाळेत जाण्यासाठी एसटीची वाट बघायची. शाळा सुटल्यावर कधी कधी एसटी वेळेवर येत नसल्यामुळे घरी पोचायला रात्रीच्या ७ .३० वाजायच्या,त्यामुळे शाळा सुटल्यानंतर बस स्टँडमध्ये एसटीची वाट बघण्यामध्ये जाणाऱ्या वेळेत शाळेतील लिखान पुर्ण करुन घ्यायची व घरी आल्यानंतर वाचन करायची ,असा दिनक्रम चालु होता .
शाळेतील तिच्या मैत्रीनींनी खाजगी तास लावलेले होते . मात्र परस्थीती नाजुक असल्याने ती क्लासेस किंवा खाजगी तास न लावता घरीच दररोज अभ्यास करायची. अभ्यासाची सवय , चिकाटी , परिश्रम घेऊन तिला तिचे मामा बापू कळसुले यांनी आर्थिक मदत करून मार्गदर्शन केले. तसेच तिला शिकवणारे वर्ग शिक्षक मोरे सर यांनी गणित तसेच इंग्रजी साठी चंदनसिवे सर व सर्व स्टाप यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे आज तिने इयत्ता १० वीच्या परिक्षेत ९५ .२० % ५०० पैकी ४७६ गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तसेच गावातुन व आसपासच्या परिसरातुन कौतुक व स्वागत होत आहे .


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश