दिघंची येथील इंद्रभाग्य संकुलाचे दहावी परीक्षेत यश

आटपाडी दि.२९ (प्रतिनिधी):

दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित एकता मोरे पाटील माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल 98.50 टक्के लागला.तसेच पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इंद्रभाग्य संकुलाच्या वस्तीगृहात राहणाऱ्या निलेश दुपडे याने 94.40 टक्के गुण मिळवून केंद्रात दुसरा व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अनुराग मोरे याने 94.20 टक्के गुण मिळवून केंद्रात तिसरा व विद्यालयात दुसरा क्रमांक तर शुभम घुटुकडे याने 93.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतिय क्रमांक मिळवला.

विद्यालयात 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे 10 विद्यार्थी असून 80 ते 89 टक्केपर्यंत गुण मिळवणारे 21 तर 70 ते 79 टक्के गुण मिळवणारे 22 विद्यार्थी आहेत.
पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूलमधील राजेंद्र खत्री याने प्रथम क्रमांक, अनिकेत काटे याने द्वितीय क्रमांक, आदित्य शेंडे याने तृतीय क्रमांक मिळविला.
इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व संस्थेचे सचिव ईश्वर तात्या मोरे पाटील, इंद्रभाग्य संकुलाच्या प्राचार्य सौ. स्वातीताई मोरे पाटील, तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.