आटपाडी/प्रतिनिधी ,
नंदकुमार विभुते:
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा ग.दि. माडगूळकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल १००%लागला.यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी आपला निकाल चांगला लावून शाळेचा गुणगौरव वाढवला.
१) प्रतीक दत्तात्रय नागरे 90.60% सेमी इंग्लिश.
२) परशुराम आदीनाथ भोसले 89% सेमी इंग्लिश.
३) कु. स्वरांजली बबन विभुते 87.60% सेमी इंग्लिश
संस्थेचे मुख्य विश्वस्त अजित चव्हाण यांनी शाळेचे प्राचार्य बी.ए पाटील,स्कूल कमिटीचे चेअरमन व माजी प्राचार्य एन.बी. विभुते, वर्गशिक्षक गायकवाड सर व किशोर चांदणे, शाळेचे क्रीडा शिक्षक ए.जी.पाटील,या सर्वांचे अभिनंदन केले.
शाळेचा शंभर टक्के निकालबद्दल माडगुळे ,य.पा.वाडी खानजोडवाडी ,लेंगरेवाडी ,व मासाळवाडी या पंचक्रोशीत शाळेचे,शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश