इस्लामपूर येथील सौ.मीरा संपत शिंदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

इस्लामपूर /प्रतिनिधी:

इस्लामपूर येथील विद्यामंदिरच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.मीरा संपत शिंदे यांना कोल्हापूर येथील न्यूज पेपर गंगाधर यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान आला.
यावेळी जिल्ह्याचे नेतृत्व तसेच शिक्षक नेते दादा लाड, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संचालक व अध्यक्ष हिंदुराव पाटील, ज्येष्ठ वकील धनंजय पठाडे, सरपंच परिषदेच्या अध्यक्षा सौ.राणीताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. चोरगे, प्राध्यापिका डॉक्टर सौ.स्मिता गिरी, प्राध्यापक अनिल इंगळे,प्राध्यापक डॉ. प्रकाश नाईक,राजेंद्र कोरे,शिक्षकांचे नेतृत्व सुभाष भोसले,सांगली शिक्षक मंचाचे विजयकुमार कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.