आटपाडी येथे शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे रविवार दिनांक १६ ते मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर अखेर श्रीमंत बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ असून दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ.आर.व्ही. गुरव कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार बी.एस.माने, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समारोपाचा कार्यक्रम असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सचिव एच.यु.पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
रविवारी पहिल्या दिवशी नोंदणी, उद्घाटन, भारतीय समूहगीत, मूकनाट्य, नकला, लोककला, लघुनाथिका, एकपात्री अभिनय, सुगम गायन, शास्त्रीय गायन, पथनाट्य, मराठी, हिंदी,इंग्रजी, वक्तृत्व, वादविवाद, व्यंगचित्र, कातरकाम, मेहंदी, रांगोळी, प्रश्नमंजुषा, शास्त्रीय नृत्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी दि.१७ ऑक्टोबर रोजी पाश्चिमात्य समूहगीत, पाश्चिमात्य एकल वाद्यवादन, लोकसंगीत वाद्य वादन, लोकनृत्य, एकांकिका,, शास्त्रीय नृत्य, पाश्चिमात्य एकल गायन, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य,स्थळ छायाचित्र, स्थळ चित्र, सांघिक रचनाकृती, भितीचित्र, निर्मिती, मातीकाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसऱ्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय लोंढे, मध्यवर्ती युवा महोत्सव समितीचे सचिव डॉ. दत्तात्रय जाधव, सदस्य डॉ. शिवाजी विभुते, प्रा.संजय हजारे, डॉ. सौ. ऋतुजा कुलकर्णी, डॉ. अमोल मोरे यांनी केले आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे या कार्यक्रमासाठी विविध रंगमंचाचे व्यवस्थापन केले आहे. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे.