शाहू शिक्षण संस्थेला आदर्श शिक्षण संस्था म्हणून सन्मानित

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा यांच्या तर्फे शाहू शिक्षण संस्थेला आदर्श शिक्षण संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम(बापू )किसनराव आवळे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव तर्फे कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातील निवडक व्यक्तीमध्ये निवड करून सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे,
शाहू शिक्षण संस्थेची स्थापना सन 1980 मध्ये माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे व संस्थेचे सचिव सिद्राम जावीर यांनी केली या शिक्षण रुपी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्ष मध्ये रूपांतर करण्यासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अब्राहम (बापू)आवळे यांनी कष्ट घेतले व या रोपट्याचं वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याची करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
आज त्यांनी संस्थेचा विस्तार राज्यभर केला आहे. बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले या संस्थेची सुरुवात वसतिगृहापासून सुरु केली. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे यशवंतराव चव्हाण यांच्या नावे पहिले वसतिगृह सरांनी सुरू केले. बघता बघता या शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील गरुड झेप घेत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत. व संस्थेचा विस्तार वाढवला त्यामध्ये आज संस्थेची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 8 वसतिगृहाची उभारणी केली आहे
तसेच इंग्लिश मीडियम, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, प्राथमिक आश्रम शाळा, ज्युनिअर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्याचबरोबर डीएड कॉलेज, महिला बीएड कॉलेज, विधी महाविद्यालय, फूड टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग कॉलेज अशी संस्थेची एकूण शंभर पेक्षा जास्त शाखांचा विस्तार महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचे काम राज्याचे माजी मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे यांनी केले आहे. तसेच यांच्या खांद्याला खांदा लावून या संस्थेच्या विस्तारामध्ये आदरणीय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा इचलकरंजीचे नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक अब्राहम (बापू)आवळे यांचा सिंहाचा वाटा आहे. बापूंनी उराशी बाळगलेले स्वप्न आहे की बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कशी आणता येईल यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव तर्फे कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातील निवडक व्यक्तीमध्ये निवड करून सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे,
शिक्षण संस्थेस बापूंच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल बापूंचे सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री विरपन्न मोइली, खासदार अमरसिंग पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले आमदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थित होते.तसेच शाहू शिक्षण संस्थेचे कदम सर, डोंबळे सर, उमेश हेगडे,गाबरीयल भंडारे उपस्थित होते.