आटपाडी कॉलेजचे सांगली विभागीय मैदानी स्पर्धेत यश

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राजे रामराव महाविद्यालय जत येथे घेण्यात आलेल्या सांगली विभागीय मैदानी स्पर्धेत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील २५ खेळाडूंनी सहभाग घेतला. तीन दिवस झालेल्या या स्पर्धेत १०० मी., २०० मी, ४००मी, ८०० मी, १५०० मी., ५००० मी, १०००० मी धावणे तसेच भालाफेक, थाळी फेक, लांब उडी या स्पर्धेत सहभागी झाले.
या स्पर्धेत क्रमांक मिळवलेले खेळाडू
१) सानिका खरात तिहेरी उडी – गोल्ड मेडल
२) रोहित लांडगे भालाफेक – सिल्वर मेडल
३) आशिष घोलप – १०० मी धावणे – ब्राँझ मेडल
४) दीपाली पुजारी – १०० मी धावणे ब्राँझ मेडल,
५) पांडुरंग देशमुख ५००० मी धावणे – ब्राँझ मेडल
६) ४बाय १०० मी रिले (महिला) – ब्राँझ मेडल
या प्रकारात महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. जत येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.त्यांना महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक गौरव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे तसेच प्राध्यापक वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.