कृषि पदवीधर संघटनेच्या क्रिडा विभाग समन्वयकपदी सचिन देशमुख.

संजय हुलगे /माळशिरस प्रतिनिधी  :

कृषि पदवीधर संघटना राज्यभर कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले नऊ वर्षे संघटन करीत असून आता संघटनेचे लोकप्रिय नेते महेश कडूस पाटील यांच्या आदेशानुसार कृषि पदवीधर संघटनेचा क्रिडा विभाग हा नव्याने सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे राज्य मुख्य समन्वयक म्हणुन श्री सचिन देशमुख ( अंतराष्ट्रीय खेळाडु ) यांची निवड कृषि पदविधर संघटनेचे अध्यक्ष श्री महेश कडूस पाटिल यांनी संचालक मंडळा च्या संमती नंतर नियुक्ती केली आहे . तरी या विभागात महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठे, सर्व कृषि महाविदयालय , तालुका , जिल्हा स्तरावर युवक व युवती पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याचे काम चालु आहे . तसेच खेळाडु सदस्य नोंदणी आज पासुन चालू करण्यात येत आहे.

हा विभाग संघटनेने कृषि क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी , विदयार्थीनी( खेळाडु ) यांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्माण केला आहे. तसेच ICAR च्या क्रिडा स्पर्धा , अश्वमेध, देशपातळीवरील आंतर विद्यापिठ क्रिडा स्पर्धा मधील पदक धारक अथवा सहभाग असलेल्या सर्व विदयार्थी आणि विदयार्थिनी यांनी या विभागात सदस्य होऊन खेळाडूं करता काम करण्यासाठी संपर्काचे आवाहन देशमुख यांनी केले आहे. आगामी काळात खेळाडू वरचा अन्याय कृषि पदवीधर संघटनेच्या माध्यमातून दूर करण्यासाठी आणि सामान्य खेळाडू च्या माध्यमातून हा विभाग मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही देशमुख म्हणाले. संघटनेच्या वतीने महासचिव प्रकाश यादव यांनी त्यांचे निवडपत्र दिले.