

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
निंबवडे
आटपाडी तालुक्यातील सर्वात यशस्वी लीग निंबवडे प्रीमियर लीग 22 पासून सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूसाठी चालू झालेली लीग यशस्वी पाच पर्व पूर्ण करून आजपासून सहाव्या पर्वाला सुरवात झाली. या लीगसाठी 14 टीम दोन गटात विभागून मैदानात उतरल्या आहेत. या लीगमध्ये खरसुंडी पूर्ण जिल्हा परिषद गट, निंबवडे पंचायत समिती गण करगणी गटातील बनपुरी,बाळेवाडी, मिटकी व माण खटाव मधील ठराविक गावातील खेळाडू सहभागी आहेत.
या लीग साठी प्रथम क्रमांक बक्षीस माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील व युवा उद्योजक विनायक शेट मासाळ यांनी दिले द्वितीय क्रमांक चे बक्षीस युवानायक अनिल शेट पाटील व दत्ता मोटे सर यांनी दिले तिसऱ्या क्रमांक चे बक्षीस बाळूमामा ज्वेलर्स उरण चे मालक पद्माकर गलांडे व युवा उद्योजक बिनूशेट मेटकरी यांनी दिले पहिल्या तीन क्रमांक चे ट्रॉफि सौजन्य आटपाडी खानापूर चे भावी आमदार संभाजी शेट पाटील विशेष अर्थ सहाय्य युवा उद्योजक आशिष कचरे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव गुरव यांनी दिले बाकी इतर ट्रॉफी व सौजन्य अंकुश देवडकर, चंद्रहार अनुसे,सचिन काकडे सर, बापू अनुसे, अशोक कारंडे,अभिजित सरगर,योगेश वाक्षे, डॉ. सचिन मेटकरी तात्यासाहेब मोटे, सचिन मोटे (सदस्य ग्रा प) अनिल मुढे (सरपंच ), भारत अनुसे, अक्षय अनुसे, राजीव मुढे , प्रवीण अनुसे यांनी दिले
सदर लीगमध्ये सहभागी टीम ग्रुप अ , वाल्या फायटर निंबवडे, राजे वरिअर्स कामत , ऋषी रॉयल्स अनुसेवाडी , भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी ( विक्रम) , ए एस इलेवन निंबवडे , डायमंड क्रिकेट क्लब गुळेवाडी, अभयदादा इलेवन वरकुटे
ग्रुप ब , क्रांती स्पोर्ट्स निंबवडे , जय अहिल्या युवा मंच अनुसेवाडी , पै .कै राजाराम वाक्षे युवा मंच वाक्षेवाडी, साहिल ज्वेलर्स कोकरेनगर, एस के फायटर घानंद , भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी (संतोष), टॅंगो टायगर यशवंतनगर टीम सहभागी आहेत
22/10/2022 ते 27/10/2022 या कालावधीत सदर स्पर्धा पार पडणार आहे. तसेच सर्व सामने youtube live होणार आहेत.या लीगचे आयोजन साहेबराव मुढे युवा मंच निंबवडे वतीने केले आहे.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक
माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश