राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक


ऑलिम्पिकसाठी शासनाकडून दोन कोटींचा निधी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताची मान उंचावलेला रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याला राज्य सरकारने दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे भांबुर्डी (ता. माळशिरस) सोलापूर जिल्ह्यातील रुद्राक्ष अठराव्या वर्षी कोट्याधीश होत नेमबाजीतील जग्तज्जेता होण्याचा मान मिळाला आहे.
जागतिक स्तरावरील नेमबाजी स्पर्धा नुकत्याच कैरो येथे पार पडल्या. यातील १० मीटर रायफल स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे अभिनंदन केले. २०२४ साठी सहभाग.
चौकाचौकात बॅनरबाजी
रुद्राक्ष पाटील याचे वडील बाळासाहेब वाघमोडे पाटील मूळचे भाबुर्डी गावचे असून शेतकरी कुटुंबातील आहेत. अनेक अडचणींचा सामना करीत शिक्षण घेतलेल्या बाळासाहेब सध्या ठाणे येथे जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख आहेत. त्यांनी गावातील व तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे रुद्राक्षच्या यशाबद्दल चौकाचौकात बॅनरबाजी दिसून आली.