पैलवान संतोष पुजारी यांची महाराष्ट्र पैलवान ग्रुपच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड!

मोहनराव पुजारी

आटपाडी दि.२०( प्रतिनिधी):

आटपाडी येथील शिवसेनेचे युवा तालुकाध्यक्ष, पुजारवाडीचे माजी उपसरपंच पैलवान संतोष पुजारी यांची पैलवान ग्रुप महाराष्ट्रच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
क्रीडा क्षेत्रात आजपर्यंत केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच सध्या करत असलेली कुस्ती,क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील वाटचाल पाहून पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने त्यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे निवडपत्र संस्थापक अध्यक्ष पैलवान विलासदादा देशमुख,उपाध्यक्ष पैलवान राजकुमार खरात, कार्याध्यक्ष पैलवान अमोद काशीद यांनी दिले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.