व्हसपेट येथे झालेल्या हॉलीबॉल सामन्यात माळशिरस संघाची बाजी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

हजरत दावलमलिक बाबा पीराच्या उरुसानिमित्त व्हसपेट ता.जत येथे हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या संघासह हजेरी लावली.अत्यंत रोमांचकारी सामने यावेळी पहावयास मिळाले. दरम्यान प्रथम क्रमांक माळशिरस (सोलापूर)च्या अमिर काझीच्या संघाने पटकावला, दुसरा क्रमांक धरणगुत्ती कोल्हापूर व तिसरा क्रमांक खानापूरने पटकावला. याशिवाय पुढील पाच विजेत्या संघास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
यावेळी हॉलीबॉल असोसिएशनचे मुख्य पंच रमेश पोवार, सहाय्यक पंच प्रशांत पवार यांनी काम पाहिले व अत्यंत जबाबदारीने सर्व सामने पार पाडले. दरम्यान जतचे हॉलीबॉलपट्टु मौला शेख यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून सर्व खेळाडू व प्रेक्षकांना मास्कचे वाटप केले.
अतिशय उत्कृष्ट सामने यावेळी पहावयास मिळाले व शेवटी आपला दिमाखदार खेळ दाखवत माळशिरस (सोलापूर)च्या अमिर काझीच्या संघाने प्रथम विजेत्याचा मान पटकावला. यावेळी उपस्थित व्हसपेटचे सरपंच रामभाऊ साळुंखे ,जतचे राष्ट्रीय खेळाडू तुकाराम मासाळ, मौला शेख, बंडोपंत निळे,आदिलशहा पटेल , श्रीकांत हुवाळे, आर पी आय जत प्रविण कांबळे, केराप्पा हुवाळे पत्रकार, राजु वाघमारे ,जेष्ट खेळाडू मुबारक नदाफ, बापु हुवाळे ,जगन जाधव, संतोष चौगुले, विनायक मनिमुले,राजु सनदी, सर्व कार्यवाहक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी समालोचनाचे काम महादेव हुवाळे व सचिन झेंडे यांनी केले.