
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
ग.दि.माडगूळकर चॅरिटेबल ट्रस्ट माडगुळे प्रस्तुत नवरात्र उत्सवानिमित्त माडगूळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष, ग्रामपंचायतचे सदस्य अमोलशेठ विभुते यांच्या सहकार्यातून साकार झालेल्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात खेळ पैठणीचा या खेळातील प्रथम बक्षिस पैठणी साडीच्या मानकरी सौ.मंगल शिवाजी लिंगडे ठरल्या आहेत.वन ग्रॅम सोन्याच्या घंटनच्या मानकरी सौ.पूजा संदीप विभुते, तर सौ.जयश्री भुषन विभुते या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या आहेत.
माडगुळे येथे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘होम मिनिस्टर’ अर्थात खेळ पैठणीचा हा खेळ तीन तास रंगला. या खेळात उखाणे,डान्स,भक्तीगीते,शेर शायरी,संगीत खुर्ची, रिंग खेळणे,तळ्यात -मळ्यात,पिना जोडणे,नाच रे मोरा,टिपरी नृत्य, अशा अनेक खेळाचा सहभाग होता. या खेळात गावातील तमाम महिला वर्गांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली. शेवटी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून सन्मान करण्यात आला.



संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु