

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
चिंचणी मायाक्का यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून रविवार 5 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी या कालावधीत बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.आटपाडी आगारामार्फत यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून बुकिंगसाठी आबासाहेब गायकवाड 7972764885 आणि डेपो संपर्क 02343 221830 या क्रमांकावर संपर्क साधून आपआपल्या गावातून गाड्या बुकिंग करून घेता येणार आहेत.
चिंचणी ता.रायबाग जि.बेळगाव येथील श्री मायाक्का देवीची यात्रा रविवार दिनांक 5 फेब्रुवारीपासून सुरू होत असून मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी अखेर ही यात्रा भरणार आहे. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी श्री मायाक्का देवीचा महानैवद्य-बोनी व पालखी सोहळा आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून व माणदेशातून अनेक भाविक उपस्थिती दाखवतात. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असल्यामुळे व गर्दीमुळे वाहनांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आटपाडी आगाराने या यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी जादा ग्रुप गाड्यांची सोय केली आहे.
रविवार दि. 5 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 14 फेब्रुवारी या दरम्यान बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आटपाडी आगारामार्फत यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून बुकिंगसाठी आबासाहेब गायकवाड 7972764885 आणि डेपो संपर्क 02343 221830 या क्रमांकावर संपर्क साधून आपल्यासाठी गावातून गाड्या बुकिंग करून घेता येणार आहेत. आटपाडी तालुक्यातील सर्व भाविकांनी सुरक्षित व सुखरूप प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करावा. तसेच बुकिंगसाठी आटपाडी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन आगार प्रमुख सदाशिव कदम यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
किल्ले बांधणी स्पर्धेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!