
‘प्रगल्भनायक न्यूज’ च्या माध्यमातून सर्व कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे श्री सिद्धनाथ यात्रेस आज सोमवार दि. १० ऑक्टोबर पासून सुरुवात होत असून गुरुवार दिनांक १३ अखेर ही यात्रा संपन्न होत आहे.या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आमच्या ‘प्रगल्भनायक न्यूज’ या यूट्यूब चैनलवरून सिद्धनाथ भक्तांना पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री सिद्धनाथाच्या पालखीचे डोंगराकडे प्रयाण होणार आहे. तसेच रात्री ९.०० वाजता जांभुळणी येथील श्रीनाथ नाट्य मंडळ प्रस्तुत, अशोक रास्ते लिखित व शरद जाधव यांनी मार्गदर्शन केलेले कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक ‘सौभाग्य नाही नशिबी माझ्या’ सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचेही लाईव्ह प्रक्षेपण प्रगल्भनायक न्यूज चैनलवरुन दाखवण्यात येणार आहे.
मंगळवार दि.११ रोजी रात्री ९.०० वाजता महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या संगीताची राणी मंगला बनसोडे, नितीनकुमार करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे.
बुधवार दि.१२ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून श्री सिद्धनाथाच्या पालखीचे गावात आगमन व भव्य मिरवणूक आणि रात्री ८.०० वाजलेपासून गजी ढोल कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.याचेही लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.
गुरुवार दि.१३ रोजी सकाळी ९.०० वाजता मेंढ्या पळवण्याचा/ बकरी पळवण्याचा कार्यक्रम आहे. दुपारी ४.०० वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात येणार आहे. तसेच रात्री नऊ वाजता पश्चिम महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासोबत ‘माझं घर माझा संसार’ ही नाटिका सादर केली जाणार आहे.
परिसरातील सर्व भाविक भक्तांनी व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी व मुंबईकर मंडळ, जांभुळणी यांनी केले आहे.
जांभुळणी यात्रेतील कार्यक्रमांचा ज्यांना उपस्थित राहून आस्वाद घेता येणार नाही, त्यांच्यासाठी यात्रा कमिटीने प्रगल्भनायक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना घरबसल्या लाईव्ह कार्यक्रम दाखवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी युट्युब वरील https://www.youtube.com/channel/UC-OnrQlejYoekE2DQ0XZc2A या लिंकवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा व सर्व अपडेट मिळवण्यासाठी व सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु