प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
ठाणे
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ” सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार” राजापूर तालुक्यातील तिवरे गावचे सुपुत्र आणि मुंबई विलेपार्ले येथे वास्तव्यास असलेले पत्रकार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांना जाहीर झाला असून शुक्रवार दि. १९ मे २०२३ रोजी ४.०० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय प्रभात सिनेमा (गोल्ड) समोर जिल्हा परिषद समोर ठाणे (प) येथे होणाऱ्या संमेलनात आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी प्रा.अशोक बागवे, मुख्य अतिथी जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक), जेष्ठ कवी सुरेश लोहार (कराड),ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित ( कोल्हापूर) विशेष अतिथी लता येडाऊ (वर्धा जिल्हा अध्यक्ष), मधुरा कर्वे (उस्मानाबाद), , खानदेश विभाग प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉ विश्वास वळवी (नंदुरबार), विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिध्देश्वर कोळी ( धाराशिव ) , आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
तरळ हे गेली २२ हून अधिक वर्षे पत्रकारिता सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या निरपेक्ष, निरलस समाजसेवेचा गौरव करताना संस्थेला आनंद होत असल्याचे जेष्ठ साहित्यिक, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ गोलघुमट यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे तरळ यांना जाहीर झालेल्या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पुरस्कारा बद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

संबंधित बातम्या
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु
किल्ले बांधणी स्पर्धेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!