बारावीच्या परीक्षेत ग.दि.माडगूळकर हायस्कूलचे यश

नंदकुमार विभुते 
आटपाडी /प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांनी घेतलेल्या एचएससी परीक्षा फेब्रुवारी 2020 या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये ग.दि.माडगूळकर हायस्कूल व पद्मभूषण वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेज माडगुळे या प्रशालेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या विद्यालयाचा निकाल 85.61 टक्के लागला. या परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्ते विद्यार्थी खालील प्रमाणे:
1)कु.शेख कलीमा निजामुद्दीन 81.69 %
2) कु. दयाळ प्राजक्ता जालिंदर 73.23%
3) कु. विभुते अनुष्का उत्तम  72.61% 

     याबरोबर या शाळेतील प्रथम  श्रेणीमध्ये 12 विद्यार्थी आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्य विश्वस्त अजित चव्हाण,मुख्याध्यापक बी.ए. पाटील,स्कूल कमिटीचे चेअरमन पाटील,माजी प्राचार्य एन.बी.विभूते, प्रशालेचे शिक्षक प्रा. सुरेश गायकवाड, क्रीडा शिक्षक ए.जी.पाटील व सर्व स्टाफचे अभिनंदन करण्यात येत आहे.