साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्याकरता महाराष्ट्र शासनाचा ठराव करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा: आमदार राम सातपुते

माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माळशिरस विधान सभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्याकरता महाराष्ट्र शासनाचा ठराव करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा असे पत्र पाठविलेले आहे. सदरच्या पत्रामध्ये साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे आहे अण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील नाव व कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे. विधानसभा व विधान परिषद या सभागृहात ठराव होणे महत्त्वाचे असते परंतु कोरोना विषारी विषाणूचा प्रादुर्भावामुळे हे शक्य झाले नाही म्हणून शासनाने हा प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यावर्षी शासनाने प्रस्ताव करून केंद्राकडे पाठवावा अशी मागणी माझ्या मतदार संघातून करीत आहे. तरी शासनाने त्वरित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या या संदर्भातील भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा असे पत्र माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी दिलेले आहे.