शिवसेनेत झालेली गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी!

भाजपवाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही-अनंत गीते यांचा घणाघात

ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर दावा करतायेत: अनंत गीते यांची एकनाथ शिंदेवर सडकून टीका

पालीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा,शिवसैनिकांची उसळली अलोट गर्दी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे

शिवसेनेच्या इतिहासात अनेकदा बंडखोरी झाली , अनेक जण वैयक्तिकरित्या सोडून गेले.  शिवसेनेत  20 जून 2022 रोजी पहिली इतकी मोठी गद्दारी  झाली.  सत्तेसाठी काय पण ही भूमिका भाजपची आहे,  ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या  सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही असा घणाघात अनंत गीते यांनी व्यक्त केला.        शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करतायेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांची पर्वा करू नका, आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, शिवसेना आमच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गद्दारांना माफी नाही , असे गीते कडाडले.
      आता  कोकणातील पाच गद्दारांना कायमचे  मातीत गाडणार असल्याचे गीते म्हणाले. आज मुंबई महानगरपालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजप ही धुळीस मिळेल असे गीते म्हणाले. पालित शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दि.(29) रोजी भक्त निवास 1 मध्ये अलोट गर्दीत पार पडला. या मेळाव्यास सुधागड तालुक्यातील गाव खेड्या पाड्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनंत गीते मार्गदर्शन करताना बोलत होते. 
       शिवसेना बुलडोजर आहे, जे जे पायाखाली येतील ते चिरडून जातील, यावर्षी च्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होईल की चार चार शिवाजी पार्क कमी पडतील. अनंत गीते म्हणाले माझं वय 72 आहे, मात्र आमदारांनी गद्दारी केली म्हणून माझं वय आता 27 झालय ,  आज केवळ शिवसेनेवर संकट नाही तर संपूर्ण भारत देशावर संकट आहे, जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही असलेला भारत देश, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत,आज लोकशाही संकटात आहे, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे,  न्यायदेवता आपल्याला न्याय देईल हा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गीते पुढे म्हणाले  शिवसेना आज ज्या संकटात आहे तिथं कणखर व जाबाज शिवसैनिकांची गरज आहे, पदे ही मानपान प्रतिष्ठा वाढविण्यासाठी नाहीत तर शिवसेनेची पदे पक्षाची संघटनात्मक ताकत वाढवणे व सर्वसामान्य गोरगरीब जनतेची पदे देण्यासाठी ही पद आहेत. आपली नाराजी नेत्यांसमोर व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक शिवसैनिकाला आहे. खासदारकी गेली तरी नेतेपण देशात अखंडपणे अबाधित राहिले आहे. अखंड भारतात शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की त्यातील कुटुंप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते व आपण सर्व कुटुंबातील सदस्य आहोत. शिवसेना हे कुटुंब आहे. शिवसैनिकांची वज्रमुठ मजबूत आहे. आणि ही वज्रमुठ आवळली आहे. शिवसैनिकांना गद्दारी मान्य नाही, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात आक्रोश दिसून येतोय. शिवसैनिकानो पेटून उठा असे आवाहन गीते यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा रानींनामा द्यायला लावणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत असे अनंत गीते म्हणाले. कुटुंबात भांडण होतात, जर आई संकटात असेल तर आपण आईला वाचवतो, आज शिवसेना संकटात आहे , आईला वाचवणे हे आपले कर्तव्ये जबाबदारी आहे, असे गीते म्हणाले. 
  शिवसेनेत गद्दारी झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळाव्याचा मान  सुधागड तालुक्याला मिळालाय. सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे गीते म्हणाले.        जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की बंडखोर आमदारांनी दिलेली कारणे म्हणजे केवळ दिशाभूल करणारी आहेत,  केवळ पैशांसाठी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. भाड्याने घरात राहणारे भाडोत्री मालक होऊ शकत नाहीत,
उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, छ. शिवाजी महाराज , छ.संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, याच सुधागडच्या भूमीत गद्दारांना हत्तीच्या पायी तुडविले होते, आज गद्दारांना पुन्हा गाडण्याची वेळ आलीय. असे राऊत म्हणाले. शिवसैनिकानो आत्ता पेटून उठा, शिवसैनिकांच्या भक्कम पायावर आज ज्यांना मोठमोठी पदे दिली ते लोक आज योगदान विसरले , आज त्यांना जागा दाखवण्याची वेळ आलीय असे राऊत म्हणाले.       या मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते,  रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे,  ज्येष्ठ सल्लागार ,  जिल्हा समन्वयक   किशोर  जैन,माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेन्द्र राउत,  महिला जिल्हा संघटिका  दिपश्री पोटफोडे, सहसंपर्क  प्रमुख 
नरेश गावंड,  जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे,पंचायत समिती सभापती नंदू सुतार,  उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, मुंबई नगरसेवक दत्ता पोंगडे, दिनेश चिले,  आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.