‘लम्पी’ने जनावरे घायाळ! जनावरांचे बाजार बंदचे आदेश!

सात तालुक्यांत प्रादुर्भाव : ३७ हजार जनावरांचे लसीकरण सुरु
संजय हुलगे व इतर प्रतिनिधी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस/आटपाडी/नगर
जनावरांमधील ‘लम्पी स्कीन डिसीज’ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरे घायाळ झाली आहेत. बाधित क्षेत्राचा विचार करून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यासह ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आटपाडी येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात येईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी दिली. तसेच अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतही परिपत्रक काढून जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत व त्यातही बहुतांश उत्तरेतील भागात जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा (लम्पी स्किन डिसीज) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाने तातडीने या परिसरातील सुमारे ३७ हजार जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेतली असून, त्यातील १८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्णही केले आहे.
लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कैप्रील्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. मागील वर्षीही जिल्ह्यात या रोगाने प्रवेश केला होता.
गेल्या पंधरा दिवसांपासून अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, कर्जत, संगमनेर, पारनेर या सात तालुक्यांत लम्पीची लक्षणे संकरीत गायांमध्ये आढळली. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तपासणी करून नमुने पाठवली असता ५० जनावरे बाधित असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक १५ जनावरे अकोले, १२ राहुरी, तर संगमनेर तालुक्यातील १० जनावरांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील जनावरे बाधित संख्या
अकोल [गर्दणी १५), श्रीरामपूर (बेलापूर ६. टाकळीभान १). नेवासा (देवसडे ४१, राहुरी (लांडेगाव १२३. कर्जत (राशीन २). संगमनेर (सादरपूर १०).
पारनेरमध्येही लागण
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथून काही शेतकऱ्यांनी जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी सोमवारी तातडीने खाना झाले. तपासणी करून या परिसरातील पाच किलोमीटर भागातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे.
आठवडे बाजार बंद
ज्या भागात लम्पी बाधित जनावरे आवळली आहेत, नियमानुसार तेथून जनावरांची वाहतूक बंद केली जाते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून या परिसरातील जनावरांचे आठवडे बाजार बंद केले जाणार आहेत.
या आजारामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. सर्वत्र तातडीने लसीकरण सुरू केलेले आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. तसेच गोठ्यात फवारणी करण्यासह स्वच्छता ठेवावी.
डॉ.विजय घनवट, पशुधन पर्यवेक्षक अधिकारी
रविवारपर्यंत १७ हजार आढळलेल्या ठिकाणापासून ५६७५ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले.
पशुसंवर्धन विभागाने तातडीने बाधित जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. या परिसरात उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण गायी व म्हैशी मिळून ३७ हजार ६३८ होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
लम्पी आजाराची लक्षणे
या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. हा आजार शेळ्या मेंढयांना होत नाही. या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास या ठिकाणी गाठी येतात. तसेच तोंडात घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात, जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांन अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोक्यामध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.
आजाराबाबत उपाययोजना
या आजाराचा प्रसार हा कीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड) होतो. त्यामुळे गोठ्यामध्ये कीटकनाशक फवारणी करावी. गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. त्यांना चारा-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी. लक्षणे आढळल्यास कळवावे. इतर जनावरांचे लसीकरण करावे.