
*जगाला युद्ध नको बुद्ध हवा. लोकं तसेच म्हणतात. कारण लोकं इतिहास वाचतात व इतिहासात कलिंग युद्ध वाचतात. ज्या कलिंग युद्धात जीवीतहानी व वित्तहानी भरपूर झालेली होती.*
*युद्ध…… कोणतेही युद्ध का असेना, त्या युद्धात जीवीतहानी व वित्तहानी ठरलेली असते. ती जीवीतहानी व वित्तहानी, त्या त्या देशातील त्या त्या युद्धाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. युद्धाची तीव्रता जास्त असेल तर जीवीतहानी व वित्तहानी जास्त आणि तीव्रता कमी असेल तर होणारं नुकसान कमी होतं.*
*बुद्ध…… बुद्ध आणि युद्धाचा तेवढा फारसा संबंध नाही. परंतु बुद्धानी दिलेले अहिंसा तत्व हे युद्ध टाळण्याचं काम करतं. ज्यातून जीवीतहानी व वित्तहानी होत नाही. म्हणूनच बुद्ध तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यांनी सांगीतलेल्या विचारानुसार वागणंही तेवढंच महत्वपुर्ण आहे.*
*युद्ध…….. युद्ध होतं वाईट विचारांनी. जर मनात वर्चस्वाचे, विस्ताराचे, स्वार्थभावनेचे कुविचार आले की बस युद्ध होतं. ज्यातून जीवीतहानी व वित्तहानी होत असते. तसं पाहिल्यास हे एक प्रकाराचं प्रदौषणच आहे. ज्याला विचारांचं प्रदुषण म्हणता येईल.*
सृष्टी…….. सुष्टी जगेल तर आपण जगू. थोरांचं म्हणणं. परंतु सृष्टी जगेल कशी? लोकं तर सृष्टीचा विनाशच करु पाहात आहेत.
सृष्टीचा विनाश. होय, सृष्टीचा विनाशच होत असलेला दिसत आहे. त्याचं कारण आहे, प्रदुषण. प्रदुषणाची अलिकडील काळात समस्या वाढलेली आहे. तसं पाहिल्यास मुखत्वे प्रदुषण अनेक प्रकाराचं आहे. ध्वनी, वायू, जल, अन्न, मोबाईल व आपल्या मनातील कुविचार. इत्यादी सर्व प्रकारचं प्रदुषण.
प्रदुषण…… आपण आज केवळ प्रदुषणाच्याच विळख्यात जगतो आहोत. जलप्रदुषण, वायूप्रदुषण, अन्नप्रदुषण व ध्वनीप्रदूषण, मोबाईलप्रदुषणाणि कुविचारांचे प्रदुषण. या सर्व प्रकारच्या प्रदुषणाच्या व्याधींनी आपल्याला घेरलंय.
जलप्रदूषण अर्थात पाण्याचं प्रदुषण. लोकांनी कारखान्यातून निघणारा सांडपाणी नदीत मिसळविलाय. ज्यातून जलप्रदूषण झालं. ज्या जलप्रदूषणानं पाण्यातील तत्सम जीवांना श्वासोच्छ्वासाचा धोका निर्माण झालाय व ते मरतात आहेत. परंतु सध्या तरी त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. लक्ष जात नाही. दुसरं प्रदुषण आहे वायूप्रदुषण. हेही प्रदुषण निर्माण करणारं कारण म्हणजे कारखाना. कारखान्यातून निघणारे विषारी वायू अर्थात सल्फर डाय ऑक्साईड व हायड्रोजन सल्फाईड अति जास्त प्रमाणात निघतात. जे विषारी असतात व ते श्वासोच्छ्वासाद्वारे माणसांच्याच शरीरात नाही तर सजीवांच्या शरीरात जातात. ज्यातून हार्टअटॅक सारखे गंभीर आजार होत असतात. तिसरं प्रदुषण आहे, अन्नप्रदुषण. अलिकडील काळात काही लोकं जास्त पैसा कमविण्याच्या हेतुतून अन्नही प्रदुषण करु लागलेले आहेत. ती मंडळी वेळेत अन्न तयार होत नाही. हा उद्देश गृहीत धरुन आधीच अन्न बनवून घेतात. त्यानंतर त्याच अन्नाला रसायनं लावून ते अन्न फ्रीज करुन महिनोगणती ठेवतात. जे अन्न खाल्याने आपल्याला महाभयंकर असे आजार होवू शकतात. जसे कॅन्सरसारखे आजार.
प्रदुषणाच्या जगात वावरत असतांना सध्या जसं अन्नप्रदुषण होत आहे. तसंच आता ध्वनीप्रदूषणही होत आहे. डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई कितीतरी डेसीबल आवाजात गाणे लावून नाचते, बागडते. परंतु त्या आवाजाचा त्रास हा आबालवृद्धांनाही होत असतो. पशुपक्षांनाही होत असतो. याचा विचारच केल्या जात नाही. ज्यात काही काही प्राण्यांच्या कानाचे पडदे हे लवचिक असतात व ते पडदे अशा विपरीत असलेल्या मोठ्या आवाजाने फाटूही शकतात व कायमचं बहिरेपण येवू शकतं. काही वृद्धांचंही तसंच होतं. वयोमानानुसार त्यांच्याही कानाचे पडदे हे पातळ होतात. ज्यातून अशा प्रकारच्या प्रदुषणाचा त्रास संभवतो.
प्रदुषणाच्या रांगेत चवथा व नवीन प्रकार आलेला आहे. तो नवीन प्रकार आहे, मोबाईल प्रदुषण. मोबाईलच्या प्रदुषणात असे असे स्मार्टफोन आले की जे मोबाईल वापरत असतांना त्याचा लोकांना त्रासच होत असतो. काही मोबाईल असेही बनावटीचे आहेत की त्यातून अंधत्व येवू शकतं. शिवाय याच मोबाईलच्या नादात लागून काही लोकं वेडेही झाले आहेत. काहींचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, तर काहींना निद्रेच्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत. पशुपक्षांनाही त्याचा त्रासच होत असून काही पशुपक्षीही या व्याधीच्या लहरी किरणोत्सारातून मरणही पावलेले आहेत.
प्रदुषणाचा आणखी एक प्रकार आहे. ज्याची आपणास कल्पना जरी असली तरी त्याबद्दल आपण अवगत नाही. ते प्रदुषण आहे, विचारप्रदुषण. याला इतिहास सुद्धा आहे.
विचारप्रदुषणाला ऐतिहासिक पुरावा देतांना रामायण व महाभारतातील प्रसंगांचा उल्लेख करावासा वाटतो. रामायण काळात रामाचं कार्य सात्विक असतांनाही केवळ मंथराद्वारे विचारांचं प्रदुषण झालं व अख्खं रामायण घडलं. तीच घटना घडली महाभारत काळात. महाभारत काळातही इंद्रप्रस्थमधील भासमान भ्रमण पाहून द्रौपदीचं हसणं, कौरव पुत्र दुर्योधनास खललं व त्यानं त्याचा विपर्यास करीत स्वतःच्या रागावर नियंत्रण न ठेवता, त्या घटनेचा बदला घेण्याचा विचार केला. म्हणजेच त्याच्या विचाराचं प्रदुषण झालं व महाभारत घडलं. पुढं याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली व विचारांचं प्रदुषण सुरुच राहिलं. अनेक राजे सत्तेवर आले व अनेक गेले. काही काही राजांची विचारांच्या प्रदुषणातूनच हत्या झाली. मग राजा दाहिरचा काळ असो वा पृथ्वीराज चव्हाणचा काळ असो, अलाऊद्दीन खिलजीचा काळ असो वा मुघल साम्राज्याचा काळ असो, शिवाजी महाराजांचा काळ असो वा इंग्रजांचा काळ असो, अन् नुकतेच झालेलं पहिलं महायुद्ध असो वा दुसरं महायुद्ध. ह्या सर्व गोष्टी विचारांच्या प्रदुषणातून घडलेल्या आहेत.
पहिलं महायुद्ध. या महायुद्धात प्रिन्स बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर होता. त्यानं कुटनीतीची व संशयास्पद राजनीती केली. ज्यावेळेस संबंध देशात शांतता होती. त्यावेळेस बिस्मार्क हा गुप्तपणे इतर देशांची भेट घेत असून गुप्तपणे वार्तालाप करीत असे. ज्यातून वाटाघाटी होत व पहिलं महायुद्ध निर्माण होण्याला तोच जबाबदार ठरला.
पहिलं महायुद्ध बंद झाल्यानंतर राष्ट्रसंघ नावाची एक जागतिक संघटना निर्माण झाली. ज्या संघटनेनं युद्ध टाळायचं ठरवलं गेलं. परंतु ही संघटना नाममात्र ठरली व जर्मनीतच हिटलरचा उदय झाला. ज्यानं आपल्यातील विचार प्रदुषणानं अगदी जागतिक स्तर नाशवला व दुसरं महायुद्ध झालं.
दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती १९४२ ला झाली व त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ नावाची आणखी एक जागतिक स्तरावरील संघटना उभी राहिली. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्या संघटनेवर अमेरिकेचं वर्चस्व आहे व अमेरिकाच सध्या आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतर देशांवर दबाव आणू पाहात आहे. ज्यातून तिसरं महायुद्ध घडून येण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवाय आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या अमेरिकेनं इस्रायलला पाठींबा देवून इराण व इस्रायल युद्धात उडी घेतली. ज्याचा परिणाम असा की इराणही आता इस्रायलच नाही तर अमेरिकेलाही दबायला तयार नाही. कारण इराणला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या चीन मदत करतोय. ज्या चीनला अमेरिकेचं वर्चस्व मान्य नाही. अन् चीन हा देश जागतिक महासक्ती बनत चालला असल्यानं व त्याला त्या रस्त्यात अमेरिकाच अडथळा ठरु पाहात असल्यानं जागतिक राजकारणात जगात दोन स्तर पडलेले आहेत. जे दोन स्तर संभावीत तिसऱ्या महायुद्धाची भीती दर्शवीत आहेत. यामध्ये समजा तिसं महायुद्ध झालंच. तर बरंच काही होईल. जागतिक राजकारणातील अनेक छोटे छोटे देश नष्टच होतील. यात शंका नाही.
जगात पहिलं महायुद्ध म्हणून ज्या युद्धाला गणलं जातं. त्यावेळेस अण्वस्राचा तेवढ्या प्रमाणात शोध न लागल्यानं त्या युद्धाची तेवढी झळ पोहोचलेली नव्हती. परंतु युद्धातून किती भयावह स्थिती निर्माण होते. हे जगानं दुसऱ्या महायुद्धात अनुभवलं. ज्यातून जगाचं अपरीमीत नुकसानच झालं. कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकून त्यांना नष्ट केलं होतं. ज्याचा परिणाम दीर्घकाळपर्यंत जपाननं अनुभवला. शिवाय वित्तहानी व मनुष्यहानीही भरपूरच झाली होती.
पहिलं व दुसरं महायुद्ध म्हणजे एक प्रकारची वर्चस्वाचीच लढाई होती. हिंसा चांगली नसते. हे सांगत राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्रसंघ यांनी बराच प्रयत्न केला युद्ध रोखण्याचा. परंतु घडलं उलटच. आजही संयुक्त राष्ट्रसंघ तोच प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात ते यशस्वी ठरलं नाही. अन् इराण इस्रायल युद्ध सुरु झालं. ज्यात अमेरिकाही युद्धात पडली.
आताचं सुरु झालेलं इराण आणि इस्रायल युद्ध. ही देखील इस्रायलची अन् खास करुन त्याचा मित्र देश असलेल्या अमेरिकेच्या वर्चस्वाचीच लढाई आहे. अन् याही लढाईत अमेरिका माघार घ्यायला तयार नाही आणि इराणही मागे हटायला तयार नाही. त्यातच दोन्ही देश एकमेकांशी असलेल्या हितसंबंधी देशांची युद्धसामग्री व इतर संबंधीत बाबींची मदत घेत आहेत. शिवाय कधीकधी शस्रसंधी होते. परंतु हे सीजफायर काही दिवस चालतं. तद्नंतर दोन्ही देशांपोकी एखादा देश अचानक हमला करतो. ज्यातून युद्ध उद्भवतं. समजा असंच जर सुरु राहिलं तर याच वर्चस्वाच्या लढाईतून बाकीचेही देश हातसफाई करुन घेण्यासाठी हितंसंबंधी देश हितसंबंधी देशांना नक्कीच मदत करु शकतील. ज्यातून दुसरं महायुद्ध जसं झालं. तसंच महायुद्ध पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र हे होवू नये म्हणून हितसंबंधी देशांनी यात आपसी चर्चा करावी. होय, मान्य आहे की अमेरिका सर्वश्रेष्ठ आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की इतर लहान लहान देश कमजोर असावेत? इराणही तेच दाखवलं. दाखवलं की इतर लहान लहान देशही तेवढेच महत्वाचे आहेत व तेवढे कमजोरही नाहीतच. मात्र तिसरं महायुद्ध जर झालं तर त्याची झळ ही सर्वच जागतिक देशांना दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत जबर बसणार आहे. कारण सन १९३९ ला जे दुसरं महायुद्ध झालं. त्यावेळेस जेवढ्या अण्वस्राचा शोध लागला नव्हता. यावेळेस त्यापेक्षा कितीतरी पटीनं अणवस्र शोधली गेलेली आहेत व त्यानुसार जगाचा विध्वंश होणार आहे. हे निश्चित आहे. त्यामुळंच तिसरं महायुद्ध टाळणं गरजेचं आहे आणि तिसरं महायुद्ध टाळायचं असेल तर इराण, इस्रायल युद्ध थांबणं गरजेचं आहे. त्यामुळंच ते थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे. ती चर्चा व्हावी व अमेरिका जरी जागतिक स्तरावरील मोठा देश असला तरी त्यांच्यावर दबाव आणला जावा. जेणेकरुन इराण व इस्रायलचं युद्ध थांबेल. त्याचबरोबर जगातही शांती नांदेल. कारण जशी देशाला युद्ध नाही तर बुद्धाची गरज आहे. तशीच जगालाही युद्ध नाही तर बुद्धाचीच गरज आहे. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती