
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
आज जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
नागपूर
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व आस्थापना येथे मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याबाबतचे परिपत्रक नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आज निर्गमित केले आहे.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड १९ आजाराची लाट पसरली असून सदर विषाणूचा शिरकाव भारतात होऊन येथे देखील कोरोना विषाणू लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन असून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये मास्कचा वापर करण्याची आवश्यकता आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, भारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण विभागाचे सचिव यांचे २४ डिसेंबर,२०२२ रोजीचे पत्र व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड १९ व्यवस्थापन संदर्भात झालेल्या आजच्या सभेच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील (ग्रामीण) सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व आस्थापना येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व भेट देणारे अभ्यांगत यांनी मास्कचा वापर करावा असे परिपत्रक आजच जारी केले आहे.




संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक