माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्याची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्याची मागणी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
माळशिरस नगरपंचायत हे तालुक्याचे मुख्यालय असून माळशिरस येथे ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी तालुक्यातील खेड्यापाड्यातून लोक उपचारासाठी येतात. परंतु ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. सदर खर्च सामान्य नागरीकांना परवडत नसल्याने नागरीकांवर वेळेवर उपचार होत नाही.
तसेच,ग्रामीण रुग्णालय माळशिरस येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे.तसेच माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांकरीता ३० बेड उपलब्ध आहेत. सदरील बेड हे रुग्णांकरीता अपुरे पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची अडचण होत आहे.ग्रामीण रुग्णालय माळशिरस येथे नविन २० बेड मंजूर करुन ५० बेडचे रुग्णालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी डॉ.आप्पासाहेब एकनाथ देशमुख-नगराध्यक्ष माळशिरस नगरपंचायत यांनी केली आहे.