

हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत येथील सातारा रोडवरील डॉ.राजेंद्र झारी यांचे
हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आले आहे.
सर्जरी विभाग, नेत्र विभाग, स्त्री रोग, बालरोग या आजारांवर मोफत व माफक दरात उपचार केले जाणार आहेत.
डॉ. राजेंद्र झारी, डॉ.अभिमान पवार, डॉ. अशितोष पाटील, डॉ. इंद्रजित भोसले डॉ. नम्रता झारी, डॉ. शिरीष चव्हाण डॉ. पृथ्वीराज मेथे, डॉ. अनुराग चव्हाणडॉ.राहुलसिंग चड्डा, डॉ. तेजस्वीनी भोसले
हे तज्ञ डॉकटर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
पोटाचे विकार, आतड्यांचे आजार, शरीरावरील गाठी, स्तनातील गाठी, हार्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, मूत्राशयाचे आजार, मुतखडावरील उपचार, मुतखड्याचे ऑपरेशन, गुदमार्गाचे विकार, मूळव्याध, भगंदर, फिशर आजारांवर विशेष तपासणी व उपचार, डोळे तपासणी व नंबर काढणे, मोतीबिंदू ऑपरेशन, काचबिंदू, तिरळेपणा, डोळ्यांचे सर्व आजारांवर उपचार व निदान, हृदयरोग, उच्चरक्तदाब, अतिस्थुलपणा,दमा या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. या शिबिरात मोफत नांव नोंदणी तपासणी नंतर मोफत औषधे देण्यात येणार आहेत. या आरोग्य शिबिराचा लाभ जत तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
भटक्या वळूला ‘लंपी’ची बाधा?