

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सिव्हिल हॉस्पिटल सांगली यांच्यामार्फत पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांचे एच्.आय.व्ही., एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न झाली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश देशमुख, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, समुपदेशक सलीम मुल्ला,शंकर संकपाळ व पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर बोलताना म्हणाले, एच आय व्ही एड्स प्रसाराचे विविध मार्ग असून समाजामध्ये त्याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. एचआयव्ही एड्सग्रस्त व्यक्तींबाबतचा कलंक व भेदभाव मिटवणे, एचआयव्हीचे प्रतिबंधात्मक उपचार आणि उपलब्ध सुविधा, तसेच पंचायत समितीच्या मनरेगा विधवा पेन्शन योजना घरकुल योजना संजय गांधी निराधार योजना या विविध योजनांमध्ये एच आय व्ही एड्स जगणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येते.
जिल्हा समुपदेशक प्रमोद संकपाळ म्हणाले,जीआयपीए हे राज्यस्तरावर व डीएलएन हे जिल्हास्तरावर एच आय व्ही एड्स सह जगणाऱ्या व्यक्तींचे नेटवर्क आहे. सदर नेटवर्क हे पी एल एच आय व्ही, सी एल एच आय व्हीला सामाजिक संरक्षण देण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर जी आय पी ए ऍक्टिव्हिटी अंतर्गत राष्ट्रीय धोरणे सुधारणे एच आय व्ही प्रतिबंधक बळकट करणे तसेच जिल्हास्तरावर नेटवर्कची निर्मिती करून बळकटीकरण आणि क्षमता वाढवणे राज्य व जिल्हा स्तरावर पी एल एच आय व्ही नेटवर्कवर आई सी इ संदेश सामग्री प्रसारासाठी मदत करणे, पी एल एच आय व्ही ना सामोरे जावे लागणाऱ्या कलंक आणि भेदभाव टाळणे अशी संकल्पना आहे,
अशी माहिती जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांनी दिली.
या कार्यशाळेत एच आय व्ही आणि एड्स प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २०१७ तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर
भटक्या वळूला ‘लंपी’ची बाधा?