आटपाडीत तीन पोलिसांना कोरोनाची लागण ; तीन दिवस आटपाडी कडकडीत बंद राहणार

आटपाडी दि.23(प्रतिनिधी):
आटपाडी येथे पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.आटपाडी शहरामध्ये शुक्रवारपासून तीन दिवस सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तसेच सोमवार दि. 27 जुलैपासून किराणा, कृषी यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
आटपाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. दुपारनंतर पोलीस ठाण्यासह शहरात, बाजारपेठेत सर्वत्र औषधाची फवारणी करण्यात आली आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शुक्रवार दिनांक 24 जुलैपासून तीन दिवस वैद्यकीय,अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शहर कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.व्यापारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.तसेच सोमवार दिनांक 27 जुलै पासून किराणामाल, कृषी सेवा केंद्र ,वैद्यकीय सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांसह व्यापाऱ्यांना करण्‍यात आले आहे .याबाबत लाऊड स्पीकरवरून सायंकाळी उशिरापर्यंत शहरात व परिसरात जनजागृती करण्यात आली आहे.