
शोभा वाघमोडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान पूजनीय आहे.म्हणून आधुनिक समाज घडवण्याचे सामर्थ्य फक्त गुरुमध्येच आहे. आधुनिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवून
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना व आपल्या शिक्षकी पेशाला न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी केले. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यात दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माळशिरस तालुका पंचायत समितीने आयोजित विद्यार्थी गुणवत्तावाढ, दशसूत्री कार्यक्रम, दिशादर्शक ,उत्साहवर्धक मुख्याध्यापक कार्यशाळा स्मृतिभवन येथे आयोजित केली होती.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार हे उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण लोहारे यांनी केले. प्रास्ताविकेमध्ये त्यांनी दशसूत्री कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली व अध्यापन कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात झाली .या प्रसंगी बोलताना दिलीप स्वामी यांनी आपल्या संस्कृतीत गुरूंचे स्थान किती महत्वाचे आहे ?गुरू म्हणजे काय ? गुरुजी या शब्दातील जी चे महत्व काय? हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून व उदाहरणातून पटवून दिले.आपल्या भारतीय संस्कृतीतील शिक्षण पद्धतीवर त्यांनी प्रकाश टाकला.ज्ञानेश्वरी ,रामायण,महाभारत यातील अनेक दाखले त्यांनी उदाहरणासहित पटवून दिली. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी.कोणत्याही आणि कसल्याही अडचणीतुन मार्ग ज्ञानेश्वरी वाचल्यावर मिळतो असे त्यांनी सांगितले. कुरणाचे त्यांनी महत्व सांगितले.
कोरोना काळात त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व सर्वांचे उपक्रम यशस्वी राबवल्याबद्दल आभार मानले.
भारतीय संस्कृतीत गुरूंचे आदराचे स्थान आहे,पूजेचे स्थान आहे.आधुनिक समाज घडविण्याचे सामर्थ्य फक्त गुरुमध्येच आहे हे सांगत असताना दिलीप स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रमातील प्रत्येक सूत्रांचे महत्व विशद केले.शिस्त आणि वेळेचे महत्व पटवून दिले,मुलांना चांगले संस्कार द्या,भारतीय संस्कृती जपा,पूर्वजांच्या संस्कृतीचे जतन करा.बरबाद पिढी म्हणून चर्चा न करता परिस्थिती बदला.मुलांसमोर वाचन करा,त्यांच्याबरोबर टीव्ही बघताना मालिका न बघता चांगले कार्यक्रम बघा.
Health is welth.
What is health?
Helth means Answer.
A-air
N-neutrition
S-sunlight
W-water
E-exercise
R-rest
सर्वात मोठा माणूस आहे.आपलं काम ही भक्ती अहेतर भ्रम ही प्रतिष्ठा आहे.अंग झटकून काम करा.बोलून नाही तर करून दाखवा . मूल्यशिक्षण ,मूल्यसंस्कार विद्यार्थी घडवा.
दिलीप स्वामी यांच्या वाणीने संपूर्ण शिक्षकवृंद मंत्रमुग्ध झाला होता .
रक्षाबंधन निमित्त “एक सायकल बहिणीसाठी”हा उपक्रम दिलीप स्वामी यांनी मांडला व त्यांच्या अनमोल अश्या मार्गदर्शनाने व बोलण्याने भावनिक होऊन खडकमळा येथील मुख्याध्यापक दिगंम्बर गायकवाड यांनी दीड लाख रुपयांचा चेक सायकल बॅंकेसाठी सुपूर्त केला. दिलीप स्वामी यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांचा सन्मानही केला.
सदर कार्यशाळेसाठी माळशिरस तालुक्याने केलेले उत्कृष्ट नियोजन व शिक्षकांची ड्रेसकोडसह उपस्थिती याबद्दलही स्वामी साहेबांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी पिलीव येथील शिक्षिका मोहिनी शिंदे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रामचंद्र कोरडे,जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी हरिश राऊत,सुहास गुरव,माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे,आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते,शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप करडे,हर्षवर्धन नाचणे,सायरा मुलाणी,सर्व केंद्रप्रमुख,विषयतज्ञ आदी उपस्थित होते. यावेळी उपक्रमशील शिक्षिका श्रीमती गिरीजा नाईकनवरे व शहजादी काझी यांनी दशसूत्री कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेखाटलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी मानले.यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.



संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश