बनपुरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शकांचा सत्कार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

बनपुरी गावामध्ये नवोदय विद्यालय पलुस येथे निवड झालेबद्दल कु.वर्षा शिवाजी सोन्नुर व चि.सुमित विलास ठेंगले यांचा बनपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या दोघांना मार्गदर्शन करणारे पोवार क्लासेस खानापूर (गारगोटी) ता.भुदरगडचे प्रल्हाद पोवार व एन.बी.पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत परीक्षेत बाबासाहेब देशमुख हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेबद्दल कु.शितल यमगर हिचा गुणगौरव करण्यात आला.
प्रल्हाद पोवार यांनी सर्व ग्रामस्थांचे कौतुक करत सामान्य मेंढपाळ कुटुंबातील दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय परीक्षेत चमकले, याचा अर्थ गुणवत्तापूर्ण गाव असून भविष्यात या बनपुरी गावात प्रत्येक घरात एक अधिकारी निर्माण व्हायला पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त केली.गावाबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमानिमित्त बनपुरी गावचे उपसरपंच विकास पुकळे, माजी सरपंच राजेंद्र यमगर, मच्छिंद्र पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, सदस्य,सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षणतज्ज्ञ, बनपुरी गावात अध्यापनाचे काम करणारे सर्व शिक्षक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार बारवकरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक असिफ मुजावर यांनी मानले.