
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक लाख पुस्तके वाचन व आकलन उपक्रमाचे तालुक्यातील एकाच दिवशी चौदा ठिकाणी शिक्षण विभागाच्या शिक्षण परिषदेत माहिती सांगण्याचा अभिनव कार्यक्रम पार पडला.

आटपाडी तालुक्यातील नेलकंरजी येथे जीवन सांवत, गोमेवाडी येथे गजलकार साहित्यिक सुधीर इनामदार, करगणी येथे कवी प्रा.सुनील दबडे, पात्रेवाडी येथे प्रा.विजय शिंदे, माडगुळे येथे प्रा.विजय शिंदे, खरसुडी येथे प्रा. श्रीकृष्ण पडळकर, घाणंद येथे प्रा.श्रीकृष्ण पडळकर, झरे येथे वाचन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख, निबंवडे येथे दिनेश देशमुख, देशमुखवाडी येथे अजय राक्षे गुरुजी, विठ्ठलापुर येथे सौ. मंगल यादव मॅडम, दिघंची भक्तीमळा येथे सौ. सुचेता देशमुख मॅडम, लिगींवरे येथे रवी भोसले गुरुजी यांनी वाचन व आकलन उपक्रमाचे महत्त्व विषद केले.त्याचबरोबर सौ.सारिका देशमुख मॅडम यांनी आटपाडी येथे आनंददायी शिक्षण परिषदेत वाचन व आकलन उपक्रमाची माहिती सांगितली.
या उपक्रमासाठी आतापर्यंत राम नाईक, राजु खांडेकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, साहित्यिक,विचारवंत मा.उत्तम कांबळे, प्रा.सुभाष कवडे या मान्यवरांनी माहिती घेऊन शुभेच्छा संदेश दिले आहेत.
हा उपक्रम आता जागतिक स्तरावर गेला आहे. यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुक्यातील सर्व शिक्षकांना वाचन कट्टा समुहाने केले. ‘वाचाल तर वाचवाल’ अशी कळकळीची विनंती सर्वाना केली.एकाच दिवशी सर्व ठिकाणी कार्यक्रम पार पडले.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापु देशमुख यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.




संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश