राजे रामराव महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

राजे रामराव महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला, या कार्यक्रमास राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील सर वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नवले सर सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बोगुलवार सर, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गावडे सर क्रीडा शिक्षक मुळे सर , राष्ट्रीय सेवा योजनेचे व राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डहळके सर ,पटेकर मॅडम, साळे सर, अभय पाटील सर, कुडाळकर सर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर म्हणाले की विद्यार्थ्या कॉलेजचा एक अविभाज्य घटक आहे विद्यार्थ्यांमधून चांगला नागरिक चांगला नेता चांगला प्रशासकीय अधिकारी चांगला उद्योग निर्माण व्हावा व त्यांनी समाजासाठी चांगले कार्य करावे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी नवले सर, सन्नके सर, कुडाळकर सर आदींनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांमधून शरद सकट ,ओंकार बंडगर, प्रवीनीं पाटील, नेहा पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सुतार व नेहा पाटील यांनी केले तर आभार ओंकार बंडगर यांनी मानले.