अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आज शिवसेनेचे नेते आनंदराव (बापू) पवार यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तम्मा कुलाळ, शिवसेना उपजिल्हा संघटक प्रदीप करगणीकर, शिवसेना जत तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन मदने, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पाटील, डफळापुर जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रवीण मदने, आदि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला.
जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्यासोबत शिवसेना नेते आनंदराव बापू पवार यांनी फोनच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा घडवून आणली. जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः जत तालुका दौरा करणार असे यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा लवकरच जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन