म्हणत जत तालुक्यातील शिवसेना भक्कम करण्याचा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा निर्धार
शिंदे गटास पाठिंबा दिलेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक संपन्न
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
तालुक्यातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटास पाठिंबा दिला असल्यामुळे, तालुक्यातील निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक बोलावून आम्ही कसल्याही परिस्थितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली व येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढू अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना शिवसेना पश्चिम विभाग तालुकाप्रमुख संजयकुमार सावंत म्हणाले की, जत तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ज्यावेळी १९९५ साली युती शासनाच सरकार होतं, त्यावेळी प्रामुख्याने जत तालुक्यामध्ये म्हैशाळ योजना पूर्ण करण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे, म्हैशाळ योजनेला सुरुवात करण्यात आली. पाणी योजनेचा पाया हा शिवसेनेने घातला आहे, उद्याचा कळस ही शिवसेनाच पूर्ण करणार आहे. असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका संघटक अमित दुधाळ म्हणाले की, निष्ठावंत शिवसेनेला सोडून गेलेल्या बांडगुळांच्या पाठीमागे एकही कार्यकर्ता नाही. कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेला खिंडार पडू देणारही नाही. ‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी युवा सेना जिल्हा उपाप्रमुख नागनाथ मोटे, युवा सेना पूर्व विभाग प्रमुख प्रवीण अवरादी, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोळी, श्रीशैल उमराणी, औदुंबर पोतदार, रमेश कदम, महेश कोळी, भारत गळवे, सागर पाटील, महिला आघाडी ता.अध्यक्ष जयश्री पाटील, तालुका उपप्रमुख हसीना पटेल, सुनंदा बालगावे यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास पाठिंबा दिलेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाळ, प्रदीप करगणीकर, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवा सेने ता.प्रमुख सचिन मदने या पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी केली असल्याची माहिती जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी गुरव यांनी दूरध्वनीवरून दिली.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन