जत आगारातून आषाढी वारीसाठी जादा बसेस : राजेंद्र घुगरे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत आगारातून पंढरपूर आषाढी वारी २०२२ यात्रेकरीता ५ जुलै पासून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दररोज सकाळी १०:३० व सायंकाळी ०५:०० वाजता सोडण्यात येणार आहेत. दिनांक १० जुलै रोजी आषाढी एकादिवशी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. असे जतचे आगार व्यवस्थापक श्री. राजेंद्र घुगरे यांनी अशी माहिती दिली.
जत तालुका विस्ताराने मोठा असल्याने जत तालुक्यातील भाविकांची पंढरपूरला जाण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. जत तालुक्यासह खेडूपाड्यातून पंढरपूरच्या यात्रेसाठी भाविक जात असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जत आगारातून विशेष ज्यादा बस सुरू करण्यात आलेल्या आहेत. दिनांक ०५ जुलै पासून दररोज २ बस सोडण्यात येणार आहेत. तसेच १० जुलै रोजी पंढरपूर आषाढी एकादशीचा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने त्या दिवशी जत आगारातून सकाळी ०७ वाजल्या पासून दर एक तासाला पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी सदर जादा बसेसचा प्रवाशी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. राजेंद्र घुगरे यांनी केले आहे.