
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे दि.११ व १२ जुलै,२०२२ रोजी डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन,आटपाडी २०२२ या संमेलनाचे निमंत्रण संमेलनाचे स्वागताध्यक्ष,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी,व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व स्टाफ यांच्यासह मान्यवरांना दिले.
संमेलनाचे निमंत्रण मंगलमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक पंढरीनाथ नागणे, हरिओम फ्रुट सप्लायर्सचे मालक बाळासाहेब सरगर,संजय मेटकरी,विजय खळगे,देवानंद लांडगे,किरण कदम,रमेश नसले,उत्तरेश्वर ट्रेडर्सचे संभाजीराव देशमुख,मार्केट कमिटीचे सचिव शशिकांत जाधव,बंडू नांगरे,जवंजाळ,राहुल विभुते,सुखदेव नवले, सुनील तळे,वसंत नसले,राजेंद्र बालटे, माणगंगा फ्रुट कंपनीचे शहाजी पाटील,विजय कदम आदि व्यापारी व मान्यवरांना देण्यात आले.
यावेळी साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठाणचे सचिव विलासराव खरात,दै.’प्रगल्भनायक’चे संपादक लक्ष्मणराव खटके,’माणगंगा’चे संचालक अप्पासाहेब खरात,कवी अरविंद चांडवले,विठ्ठल (हरी) लांडगेे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु